भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांचे कट्टर समर्थक बबलू खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असून या संदर्भात त्यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
अनिल चौधरी यांचे समर्थक बबलू खान यांनी सोशल मीडियात टाकलेल्या एका पोस्टवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात बबलू खान यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १८/०४/२०२३ मंगळवार या दिवशी माझ्यावर सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या प्रकरणी आमदार संजय सावकारे यांचे स्विय – सहाय्यक असलेले तारकेश्वर राहणे यांच्या फिर्यादीवरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत असताना अनेक जण आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रश्न तसेच समस्या जनजागृती, सोडवण्याचा प्रयत्न करतात.
अगदी त्याच पद्धतीने स्थानिक आमदारांबाबत शहरात चुकीच्या पद्धतीच्या विविध चर्चा सुरू असताना त्या आशयाची पोस्ट सोशल मीडियाच्या फेसबुक या माध्यमावर मी टाकली होती, आमदार सावकारे उच्च शिक्षित आमदार असताना त्यांच्याबाबत उलट- सुलट चर्चांना उधान आले आहे. उच्च शिक्षित आमदारां बाबत त्या चर्चा एकूण मी असह्य झालो. अल्पसंख्याक समाजातील एक जागृत योग म्हणून मी तो विषय घेऊन सोशल मीडियावर मांडण्याचा प्रयत्न केला.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, आता सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली म्हणजे त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. अनेक जण आपली कमेंट्स टाईप करून व्यक्त होतात. म्हणूनच ती पोष्ट टाकली. याबाबत विषयाची सविस्तर चौकशी न करता अथवा याबाबत शहानिशा न करता आमदार संजय सावकारे यांनी भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षातून आमदार असताना राजकीय दबावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून आपल्या सहाय्यकाच्या माध्यमातून माझ्यावर थेट भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या निवेदनात शेवटी म्हटले आहे की, आपण एक अल्पसंख्यांक समाजातील तरुण युवक असून सामाजिक कार्यामध्ये भुसावळ शहरात कार्यरत असतो, अनेक सामाजिक विषयांना देखील वाचा फोडण्याचे कार्य मी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. यामुळे यांना त्या कारणामुळे अनेक जण चुकीच्या दृष्टीने मला लक्ष करण्याचा प्रयत्न करतात अगदी तोच प्रकार माझ्यासोबत आमदार संजय सावकारे यांनी आपल्या आमदारकीचा गैरवापर केला आहे.
सत्ताधारी असलेले आमदार संजय सावकारे यांनी राजकीय दबाव वापरून आपल्या स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून मी अल्पसंख्याक समाजातील असल्याकारणाने खोटा गुन्हा दाखल केला आहे, माझ्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा ही बाब नमूद करतो की, जातीय व्यवस्थेची किती मोठ्या प्रमाणात आज देखील किड जिवंत आहे, ही दुर्दैवी घटना आहे. महोदय, मी सोशल मीडियावर टाकलेल्या घटनेची चौकशी करून खरच विकास कामांमध्ये भ्रष्ट्राचार चालला आहे का ? याबाबत सविस्तपणे चौकशी करावी, जेणे करुन सत्य घटनेचा पर्दाफाश होईल अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.