भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून शहरातून समस्त ब्राह्मण समाज व परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
कोरोनाच्या आपत्तीनंतर यंदा दोन वर्षांनी भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात सायंकाळी शहरातील अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या तालावरील महिलांच्या लेझीम पथकाने यात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जामनेर रोडवरून शोभायात्रेत प्रारंभ झाला. तर, म्युनिसीपल पार्कमधील श्रीराम मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. यात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी दिलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला.