Home Uncategorized भुसावळ-बांद्रा ‘खान्देश एक्सप्रेस’चा शुभारंभ

भुसावळ-बांद्रा ‘खान्देश एक्सप्रेस’चा शुभारंभ

0
47

भुसावळ प्रतिनिधी । नंदुरबार-सुरतमार्गे धावणार्‍या भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ झाला असून यामुळे प्रवाशांची सुविधा होणार आहे.

खान्देशातील बरेचसे नागरिक हे नोकरीनिमित्त सुरत, वापी, वलसाड आदी शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे याच मार्गाने जाणारी भुसावळ ते बांद्रा एक्सप्रेस सुरू व्हावी यासाठी खासदार रक्षाताई खडसे आणि खासदार ए.टी. पाटील यानीं पाठपुरावा केला होता. यानुसार काही दिवसांपूर्वीच ही रेल्वे गाडी सुरू होणार असल्याचे घोषणा करण्यात आली होती. आज या गाडीला प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ट मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मी नारायण, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता पी. के. भंज, मंडळ दूरसंचार आणि सिग्नल अभियंता विजय खैची,जिल्हा भाजपा सरचिटणीस नगरसेवक प्रा. सुनील नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते

भुसावळ रेल्वे स्थानकावर आमदार संजय सावकारे यांनी हिरवी झेंडी दाखवून खान्देश एक्सप्रेसचा शुभारंभ केला. ठिकठिकाणच्या स्थानकांवर या एक्सप्रेसचे स्वागत करण्यात येत आहे. ही रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार असून यामुळे खान्देशातील प्रवाशांची सुविधा होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound