भुसावळातील नवीन आरोग्य केंद्रासाठी जागेचा प्रश्‍न मार्गी लावा : डॉ. नि. तु. पाटील

भुसावळ प्रतिनिधी । शहरात नव्याने उभारण्यात येणार्‍या आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर झाला असून याच्या जागेसाठी नगरपालिकेनेही प्रस्ताव पाठवला असून यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजन डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजन डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन भुसावळातील नवीन आरोग्य केंद्रासाठी जागेचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भुसावळ शहरात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी सन.२०१९-२० च्या सप्लीमेंटरी पीआयपी नुसार केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.या नुसार भुसावळ शहरात आरोग्य केंद्राकरिता २० हजार चौरस फुट जागेची मागणी केली होती.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे. की, संबंधीत केंद्रासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे आणि मी यासाठी यावल-रावेर रोडवरील राहुल नगर शेजारी सुचवली होती. महात्मा गांधी पुतळ्यापासून उत्तर बाजूकडील यावल रस्त्यालगटतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र असल्याने नागरिकांना जास्तीत जास्त लाभ घेता येईल असे यासाठी आरोग्य केंद्र याच भागात असावे असे आमचे मत होते. या अनुषंगाने सदर जागेची मोजणी केल्यानंतर त्या जागेचा ७/१२ हा भुसावळ नगर परिषद मालकीचा नसल्याचे लक्षात आले.तरी सदरची जागा आरोग्य केद्र,जळगाव यांच्या नावे लावण्यासाठी भुसावळ नगरपरिषदने संपूर्ण प्रस्ताव दि.१०/०३/२०२१ रोजी पाठवला आहे. मात्र नियोजीत आरोग्य केंद्राला जागा प्रदान करण्यासाठी हालचाल करण्यात आलेली नाही. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने जागेवर आरोग्य केंद्राचा उतार लावावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content