भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत शिंदे गटात सहभागी होणार्यांची संख्या वाढत असली तरी भुसावळातील बहुसंख्य पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे.
भुसावळात शिवसेना पदाधिकार्यांची बैठक जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला डॉ.मनोहर पाटील, प्रा.उत्तम सुरवाडे, विलास मुळे, ऍड. मनोहर खैरनार, इलियास शेख व रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी . शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी रावेर लोकसभेतील सर्व पदाधिकारी बांधिल असल्याचा ठरावही एकमताने संमत करण्यात आला.
दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातून ५० हजार सक्रीय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. पक्षाने ऑफलाईन सदस्य नोंदणी सुरू केली आहे. प्रत्येक गावातील पक्षाचा गट प्रमुख, गणप्रमुख, उपगणप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, उपशहरप्रमुख संघटक, सरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुखांचे प्रतिज्ञापत्र शक्य तेवढ्या लवकर सादर करा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.