भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोडवर असलेल्या मुक्ताई कॉलनी येथे मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होती. यावेळी शिबीरात जवळपास 156 जणांनी रक्त तपासणी करण्यात आली. याबाबत महिती अशी की, भागवत कथा कार्यक्रमाला आरोग्य सेवेची जोड देत सीबीसी, शुगर, थायरॉईड, टीएसएच, आरए ह्या रक्त चाचण्या ३१ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ दरम्यान धर्म मंडपात मोफत करण्यात आल्या. उदय बोंडे, नयना बोंडे व परिसरातील सहकारी सदस्यांतर्फे मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जळगाव रोड भागातील श्रीनगर, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, अष्ट विनायक कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भोई नगर, मोहित नगर, जुना सातारा या परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी परिसरातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच जेष्ठ नागरिक अशा सर्वानी मिळून सुमारे १५६ व्यक्तींनी मोफत रक्त तपासणी शिबिराचा लाभ घेतला असे उदय बोंडे यांनी सांगितले. या रक्त तपासणीला बाहेर १५०० रुपये लागतात पण मोफत रक्त तपासणी केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या शिबिराला खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून नागरिकांना फायदा झाला आहे शनिवार दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता सर्व रिपोर्ट नागरिकांना दिले जातील असे प्रा.धिरज पाटील यांनी कळवले आहे. माशलॅब तर्फे दिपक माळी, आरती काकडे यांचे सहकार्य लाभले. प्रसंगी उदय बोंडे, नयना बोंडे, प्रा.धिरज पाटील, सुनील बऱ्हाटे, किशोर चौधरी, तुषार नारखेडे, टिकाराम राणे, अमोल पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील, अनिल नारखेडे, अशोक बेंडाळे, प्रदिप बोंडे, प्रमोद बोंडे यांनी परीश्रम घेतले.