सामूहिक आत्महत्या प्रकरणी दोघे अटकेत

भडगाव प्रतिनिधी । सर्वांना हादरवून टाकणार्‍या सामूहिक आत्महत्याप्रकरणी संशयित घरमालकासह त्याच्या जावयाला पोलिसांनी अटक केली असल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.

पोलीसांनी भडगाव येथे बब्बू सय्यद हे भाड्याने राहत असलेल्या घराचे मालक इलियास बेग व त्याचा जावई साजिद विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. २२ मार्च रोजी येथील टोणगाव भागातील रहिवासी इसम बब्बू सय्यद या बालकाची हत्या करण्यात आली होती. या खुनाचा पोलिस तपास करत होते. या दरम्यान मुलाच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी घरमालक इलियास बेग याने १५ हजार रुपयांची मागणी मृत मुलाचे वडील बब्बू सय्यद यांच्याकडे केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात मृत बब्बू सैयद यांच्या मुलाने पोलिसांना घरमालक आणि त्याच्या जावयावर संशय असल्याची फिर्याद दिली. यामुळे मृत बब्बू सय्यद याचा मुलगा नाहिद उर्फ हमजा याने दिलेल्या तक्रारीवरून घरमालक इलियास बेग आणि त्याचा जावई साजीद यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी घटनास्थळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधीकारी नजीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक आनंद पठार उपस्थित होते.

Add Comment

Protected Content