भुसावळ (प्रतिनिधी) या पूर्वीच्या 1000 मे.वेंट प्रकल्पामध्ये स्थानिक तरूणांना डावलून सर्व परप्रांतीय तरूणांना रोजगार देण्यात आला होता. परंतु आता नवीन प्रकल्प 660 मे.वॅट उभारण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये स्थानिक तरूण व ठेकेदारांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे,म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय कल्याण विभागाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांनी मुख्य 660 मे.वॅट थर्मल प्रकल्पाचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन प्रकल्प 660 मे.वॅट प्रकल्पात भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. स्थानिक तरूणांना त्यांच्या पात्रतेनुसार व स्थानिक ठेकेदाराला दिपनगरमध्ये रोजगार मिळावा. मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको, उपोषण, जेलभरो, नवीन प्रकल्पामध्ये काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
भुसावळ तालुक्यातील निंभोरा, कपिल वस्ती, पिंपरी सेकम, साकरी, फेकरी, फुलगाव, दिपनगर, वरणगाव, वरणगाव फॅक्टरी, बोदवड, मुक्ताईनगर, भाई भगवान साळवे नगर, कंडारी, किन्ही, खडका, अकलुज, साकेगाव, वराडसीम, व भुसावळ तालुक्यातील सर्व स्थानिक सुशिक्षीत बेरोजगार तरूणांचा दिपनगर 660 मे.वॅट नवीन प्रकल्प मध्ये रोजगार देण्यात यावा. तसेच स्थानिक ठेकेदारांना ठेक्यात प्राधान्य देण्यात यावे. तसेच मजदूरांना शासनाच्या दराने रोज मिळावा. मजदूरांना आठवडयातुन एकदा सुट्टी मिळावी व मजदुरांना संरक्षण साहीत्य मिळावे.तसेच मजदुरांचा जीवन विमा काढण्यात यावा,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.