मुख्यमंत्री लवकरच रिक्षा-टॅक्सी चालक मालक महामंडळ स्थापन करणार 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळाची स्थापन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महामंडळ स्थापन करण्याची जबाबदारी माजी मंत्री उदय सामंत, माजी महापौर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रिक्षावाला, पानटपरीवाला, वॉचमन अशी टीका केली होती. याल प्रत्युत्तर देण्याची सुरूवात झाली आहे.

रिक्षा-टॅक्सी महामंडळ असे असणार?

परिवहन किंवा कामगार विभागाच्या अंतर्गत महामंडळ स्थापन करणार. राज्यात साडेआठ लाख रिक्षा आहेत. तर 1 लाख 20 हजार टॅक्सी आहेत. 60 वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन मिळणार. महिलांना प्रसुतीसाठी मदत केली जाणार.

Protected Content