यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अंजाळे येथे वैकुठवासी जगन्नाथ महाराज संस्थाच्या वतीने मागणीचा पाठपुरावा केल्याने या ठिकाणी किर्तन सभागृहाच्या ईमारतीचे भुमिपुजन अनेक संत व महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावल तालुक्यातील अंजाळे गावातील जळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांच्या मंदिरा स्थळी ५० लाख रूपये खर्चाचे भव्य असे किर्तन सभागृहात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री ना.गिरिष महाजन यांच्या विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या किर्तन सभागृहाचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी प पुज्य गोपाल चैतन्य जी महाराज, प.पुज्य महंत कृष्णगीरी जी महाराज सावदा ,पं पुज्य महंत स्वरूपानंदजी महाराज डोगरदें, शास्त्री स्वयमप्रकाशजी महाराज स्वामीनारायण कोठारी सावदा, राजेंद्र प्रसाद महाराज स्वामीनारायण मंदीर भुसावळ, पं. पुज्य पवणदासजी महाराज फैजपुर, हभप धनराज महाराज गादीपती जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळे ह.भ.प. भरत महाराज म्हैसवाडीकर, अंजाळे गावाच्या सरपंच नलिनी यशवंत सपकाळे, यावल कृषी उत्पत्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, तालुका सराधिटणीस विलास चौधरी, उजैनसिंग राजपूत, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, सहकार आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे, दिपक चौधरी, जगन्नाथ महाराज संस्थान अध्यक्ष अंजाळे व पचक्रोशितुन आलेले सर्व वारकरी आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा भुमिपुजन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.