जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एकीकडे शेळगाव बॅरेजचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेळगाव ते यावल मार्गावरील तापी नदीच्या उंच पुलासह कडगाव ते जोगलखेडा मार्गावरील वाघूर नदीच्या पुलाचे भूमीपुजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी आ. संजय सावकारे व आ.शिरीष चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कडगावं ते जोगलखेडा या जोड रस्त्यांसह वाघूर नदीवर पुलाचे भूमिपूजन गुरुवारी आज दुपारी ४.३० वाजता तर शेळगाव ते बामणोद या मार्गावरील तापी नदीच्या पुलाच्या कामाचे भूमिपुजन सायंकाळी ५.३० वाजता शेळगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या पुलाच्या कामासाठीअनुक्रमे २१ कोटी व ४४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी आदीं मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.