एरंडोल प्रतिनिधी । आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या एरंडोल तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पंचायत समिती माजी सभापती दिलीप रोकडे, उपसभापती अनिल महाजन, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील, युवासेना तालुका समन्वयक कमलेश पाटील, एरंडोल कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन पाटील, भातखेडे सरपंच मनोहर पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील,निपाणे सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच बाळु महाजन, माजी सरपंच श्रीधर पाटील, गालापुर सरपंच महेंद्र महाजन, माजी सरपंच आरिफ शेख,अंतुर्ली माजी सरपंच दंगल पाटील,पुंडलीक पाटील,मुकुंदा पाटील, तसेच गालापुर, निपाणे, पिंप्रीसीम व अंतुर्ली येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी अमोल पाटील यांनी सदरची कामे उत्कृष्ट दर्जाची करणेसाठीच्या सुचना संबंधित ठेकेदारास केल्या व गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने तात्काळ सुरू करू असे उपस्थितांना आश्वासित केले.
याप्रसंगी अमोल पाटील यांच्या हस्ते मौजे गालापूर ता.एरंडोल येथे स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे,मौजे निपाणे ता.एरंडोल येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे,मौजे निपाणे ता.एरंडोल येथे दत्त नगर भागात पेव्हर ब्लॉक बसविणे, मौजे निपाणे ता.एरंडोल येथे दत्त नगर भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे, मौजे निपाणे ता.एरंडोल येथे इंदिरा नगर भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे,मौजे निपाणे ता.एरंडोल येथे भूमिगत गटार करणे, मौजे पिंप्री सीम ता.एरंडोल येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे,मौजे पिंप्री सीम ता.एरंडोल येथे पिंप्री सीम ते भातखेडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,मौजे अंतुर्ली ता.एरंडोल येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे.आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.