नशिराबादला पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन अत्याधुनिक इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील उपस्थित होते. 

नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन अत्याधुनिक इमारत बांधून सर्व सुविधा गावकर्‍यांना मिळाव्या यासाठी वारंवार जि.प.उपाध्यक्ष लालचंद  पाटील यांनी पाठपुरावा करून अखेर सहा कोटी रुपयाच्या निधीतून इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. 

नशिराबाद ग्रामपंचायतीचे आता नगरपंचायत झाली आहे. त्यात आता नशिराबाद येथील लोकसंख्या ५० हजाराहून अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अपूरी पडत आहे. शिवाय नशिराबाद आरोग्य केंद्राला अनेक गावे जोडले गेले आहे. तालुक्यातील नागरीकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने योग्य व सुलभ पध्दतीने उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जातीने लक्ष देवून जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला. आज सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे रंजना पाटील, आमदार राजूमामा भोळे,  उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ग्रामपंचायत सदस्या यमुनाबाई रोटे, जागृती चौधरी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/951588558964362

Protected Content