नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य आहे. महायुतीने तिसऱ्यांदा शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे लोकसभेसाठी इच्छुक होते. सध्या छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक समजले जाणार मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील भुजबळ फार्मवर छगन भुजबळांची भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. मात्र १७ मे रोजी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज आहे. असे विधान केले. यानंतर नुकतेच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी नाशिकच्या भुजबळ फार्म येथे दाखल झाले आहे.
भुजबळांच्या नाराजीची चर्चा असताना भाजपचे संकटमोचक भेटीला
11 months ago
No Comments