जळगाव प्रतिनिधी । येथे बीएचआर या अवसायानात असलेल्या सोसायटी विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात उद्या 19 जुलै रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन होणार आहे.
तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून असंख्य ठेविदार पेन्शनर्स, शेतकरी व सामान्य व्यापारी स्वत:चा हक्काचा घामाचा पैसा परत मिळविण्यासाठी संपूर्ण ठेवीदार अवसायकांच्या व कर्जदारांच्या विरोधात एक बटले आहेत. या आंदोलन हे पैसे मिळविण्याची अंतिम पुर्ण लढाई असून कायमस्वरुपी अशा सोसायट्यांना आळा बसावा ह्या हेतूने व बीएचआर मध्ये अडकलेले पैसे प्रॉपर्टीचा लिलाव होवून व्याजासह परत भेटले पाहिजेत. यादृष्टीने दि. 14 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतर वर राष्ट्रव्यापी आंदोलन होणार आहे. सदरी आंदोलन सतीश बोधणकर नांदेड, दिलीप सुरवाडे, विजय मनुंरकर, किर्ती वारके, रमाकांत कोदूरवार, इबादुल्ला खान अशा असंख्य समग्र महाराष्ट्रीयन देविदातुंच्या नेतृत्त्वाचे होणार असल्याने बीएचआर संघर्ष समितीचा अध्यक्ष सतीश बांधनकर यांनी सांगितले आहे.