किनगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वास्तूचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बु. येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच बाजीराव नगर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या वेळी किनगाव बुद्रुक येथील सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमीपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. यात किनगाव बुद्रुक सरपंच सौ. निर्मला पाटील व संजय पाटील, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी व सौ.रत्ना चौधरी तसेच, डॉ.अजय चौधरी, सुरेश देवरे, प्रवीण महाजन यांचे हस्ते भूमीपूजन पार पडले.

यावेळी माजी आ. रमेश चौधरी , प्रगतशील शेतकरी सुरेश चौधरी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य आर.  जी.  पाटील ( नाना ), किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन, स्वामी समर्थ जळगाव गूरूकुल केंद्राच्या प्रमुख मीना इंगळे, किनगाव येथील पत्रकार आर.ई.पाटील, मनीष कवठळकर, गुलाब पाटील, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील( टेलर ), माजी सरपंच मिलिंद चौधरी, स्नेहा चौधरी, सुधीर इंगळे, यावल केंद्राचे सेवेकरी बाळू भोगे, किशोर श्रावगे, धवल भोगे, केंद्र प्रतिनिधी संगीता काटकर, साकळी केंद्राचे पंकज मराठे, डांभुर्णी केंद्राचे पंकज कासार, महेंद्र महाजन, सुकलाल महाजन, दत्तात्रय पाटील, कैलास पाटील, संदीप सोनार, सुरेश देवरे, सुनील पाटील, प्रताप शंकपाळ, संजय वराडे, दिवाकर फालक, उंटावद केंद्राचे सोनू सुतार, अमोल पाटील, दत्तात्रय पाटील, कैलास पाटील, दिगंबर पाटील, पुरुषोत्तम पाटील, पुंडलिक महाराज, पितांबर न्हावी, सुभाष अहिरराव व किनगाव चिंचोली डांभुर्णी, परीसरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किनगाव ग्रा. प. सदस्यांनी व सेवेकरीनी मोलाचे सहकार्य केले.

 

Protected Content