जळगाव,प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांचा प्रचार दौरा गुरुवारी शहरात पार पडला. सकाळी वाल्मिक नगरात आ.भोळे यांनी महर्षी वाल्मीक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आशिर्वाद घेतल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. ढोल-ताश्यांच्या गजरात व फटाके फोडून प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला.
आ. भोळे यांच्या प्रचार रॅलीत नगरसेवक जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, प्रविण कोल्हे, भारत कोळी, किशोर बाविस्कर, पार्वताबाई भील, महेश चौधरी, विष्णू भंगाळे, चेतन सनकत उपस्थित होते. तसेच शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, रिपाइंचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, गीताबाई वाघ, शिवसेनेच्या मंगला बारी, ज्योती शिवदे, आबा बाविस्कर, नवनाथ दरकुंडे, शरिफा तडवी हे देखील उपस्थित होते. यांच्यासह मंडळ अध्यक्ष कपील पाटील, परेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष बापू ठाकरे, युवा मोर्चाचे आनंद सपकाळे, नितीन तायडे, मुकेश कुलकर्णी, जयश्री पाटील, महेश पाटील, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. महर्षी वाल्मिक मंदिर येथून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर गोपाळपुरा, झोपडपट्टी परिसर, पक्की चाळ, दिनकर नगर, असोदा रोड, मोहन टॉकीज परिसरमार्गे तानाजी मालुसरे नगरात प्रचार रॅली समाप्त झाली.दुपारी ५ वाजता जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या हनुमान मंदिरात प्रचार नारळ वाढवून प्रचाराला सुरूवात झाली. त्यानंतर श्री गोगादेवजी महाराज व श्री रामदेवजी महाराज मंदिरात आ.सुरेश भोळे यांनी दर्शन घेतले. यानंतर रॅली बळीरामपेठेच्या दिशेने मार्गस्थ झाली. याप्रसंगी भाजपा उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक मुकूंदा सोनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.जिल्हापरिषद, तहसील कार्यालय, बळीराम पेठ, शनिपेठ पोलीस ठाणे, गुरूनानक नगर, मायका देवी मंदिर, गवळी वाडा, रिधुर वाडा, शनिपेठ, भिलपुरा, बालाजी पेठ, सराफ बाजार, बोहरी गल्ली, भगवान नगर, जोशी पेठ, विठ्ठलपेठमार्गे राममंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला.
महिलांनी केले औक्षण
महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांची प्रचार रॅली प्रत्येक परिसरातून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. आ.भोळे यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात येवून फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. दरम्यान, भिलपुरा चौकात पोहचल्यानंतर त्याठिकाणी अयाज अली यांच्यासह मुस्लीम बांधवांकडून आ.राजुमामा भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दर्ग्यावर चादर चढवून आ.भोळे यांनी प्रार्थना केली.