भुसावळ प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत पुढील महिन्यात संपत असून विद्यमान मंडळाला मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ५ ऑक्टोंबरला संपत आहे. मात्र राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ जुलैला दिलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे आता विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे.
यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या अंतीम टप्प्यात पोचले असून तो लवकरच पणन विभागाकडे सादर होणार आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळ आपल्या पदांवर कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.