मुक्ताईनगर येथे भिल्ल समाजाच्या दफनभूमीसाठी तहसिलदारांना निवेदन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) शहरातील भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर भुसावळ येथील व्यक्तीने हक्क सांगितल्याने पंचवीस ते तीस वर्षांपासून समाजाची असलेली दफनभूमी ही तीच कायम ठेवण्यात यावी अन्यथा त्या जागेच्या शेजारी दुसरी दफनभूमीत जागा मिळावी या मागणीसाठी समाजाच्या वतीने तहसीलदार वाडकर यांना निवेदन देण्यात आले.

 

गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून भिल्ल समाजाची दफनभूमी ही गट नंबर 732 733 735 736 यामध्ये असून परंपरेनुसार त्याच जागेवर दफनविधी समाज करत आलेला आहे. परंतु, गेल्या सात दिवसांपूर्वी भुसावळ येथील एका व्यक्तीने ही जागा माझ्या मालकीची असल्याचे सांगून या ठिकाणी दफन विधी करू नये असे सांगितले. त्यामुळे समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ज्या दफनभूमीवर दफन विधी केला जात आहे त्याच जागी दफनविधी ही परवानगी मिळावी अन्यथा त्याच जागेच्या शेजारी दुसरी जागा मिळावी अशी देखील मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी दादू ठाकरे, जानराव गायकवाड ,अशोक सोनवणे, दिनेश सोनवणे ,ईश्वर सोनवणे ,धनराज मोरे ,अजय मोरे ,सिताराम मोरे, शालिक सोनवणे,बच्चन सिंग पवार ,चेतन मोरे ,कैलास मोरे, दिलीप पवार, रामचंद्र सोनवणे,श्रावण सोनवणे,संजय साळुंखे ,सुपडू भिल्ल या प्रमुख समाज बांधवांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Add Comment

Protected Content