‘ती’ फांदी न हटविल्यास आंदोलनाचा इशारा

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । पंचक ते लोणीच्या दरम्यान महामार्गावरील अपघाताला निमंत्रण देणारी फांदी न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाने दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, लोणी ते पंचकच्या दरम्यान, एका झाडावर तुटलेली फांदी ही केव्हाही खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे. हे काम सार्वजनीक बांधकाम खात्याचे असून संबंधीत खाते हे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील जनता करत आहे. या संदर्भात येत्या सात दिवसांमध्ये ही फांदी न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार आणि तालुकाध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी दिला आहे.

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने सार्वजनीक बांधकाम खात्याचे चोपडा येथील अभियंता विजय कोळी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ते म्हणाले की, अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर महामार्गावरील जीर्ण झालेली झाडे अथवा त्यावरील फांद्या काढण्याचे निर्देश देण्यात आले असून याची पाहणी करून येत्या एक-दोन दिवसात कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

Add Comment

Protected Content