भावी शिक्षकांनी ‘डीएड’कडे फिरवली पाठ

teacher

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डी.एड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून आज बुधवारी (दि.२४ जुलै) रोजी तिस-या प्रवेश फेरीतून प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यात अनुदानित व विना अनुदानित डीएड अभ्यासक्रमाच्या एकूण ५३ हजार जागा असून प्रवेशासाठी केवळ १० हजार ७२८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत.

परिणामी प्रवेश अर्ज करणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे. डीएड् अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते. मात्र, बारावीनंतर डी.एड्. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून यंदा प्रवेश क्षमते एवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी राज्यातील डीएड्. अभ्यासक्रमाच्या तब्बल ३५ ते ४० हजार जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातील ५० टक्के विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होता. त्यामुळे गेल्या 3 वर्षात डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली. त्यातच शासनाकडून राबविल्या जाणा-या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याऐवजी काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशास पसंती देत आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत, असे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Protected Content