पाचोरा प्रतिनिधी । महसूल दिनानिमित्त कृष्णापुरी – पाचोरा शहर भागातील पोलीस पाटील भारती बेंडाळे (सावंत) यांना आदर्श महिला पोलीस पाटील म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे,आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील तसेच वीज वितरण कंपनीचे माजी वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश बेंडाळे सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत उपस्थित होते.
भारती बेंडाळे (सावंत) या हा पुरस्कार पटकविणाऱ्या पाचोरा तालुक्यातील पहिल्या महिला पोलीस पाटील आहेत हे विशेष तसेच कृष्णापुरी भागातील देखील पहिल्या महिला पोलीस पाटील म्हणून त्यांनी बहुमान पटकाविला आहे. भारती बेंडाळे (सावंत) ह्या सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत यांच्या धर्मपत्नी असून त्यांचे विवीध क्षेत्रात कार्य उल्लेखनीय असून त्यांच्याच कामाची तसेच दोघी पती – पत्नी यांची केलेल्या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला असून त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.