यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील बौद्ध पंच मंडळाच्या वतीने येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने मिरवणुक काढण्याबाबत शासनाने परवानगी द्यावी, या संदर्भात महसुलचे मुक्तार तडवी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना आज निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात येणार असुन, शासनाच्या नियम अटी शर्तीचे पालन करून कोरोना संसर्गजन्य आजार पसरू नये याची खबरदारी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची साजरी करण्यात येणार असुन या मिरवणूकित सहभागी होणारे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला माक्स व सुरक्षित अंतर ठेऊन अतिशय नियमांचे काटेकोर पालन करीत ही मिरवणूक काढण्यात येणार असुन ,आपण आम्हास डॉ .बाबासाहेबांची जयंतीच्या मिरवणुक काढण्याची परवानगी द्यावी. आपण परवानगी नाकारत असाल तर आम्ही समस्त समाज बांधव रस्त्यावर उतरून शासनाचा लोकशाही मार्गाने तीव्र जाहीर निषेध करून प्रसंगी धरणे आंदोलन देखील करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असा इशारा शासनाला देण्यात आला आहे.
तरी आमची मागणी मान्य करून रीतसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी.अशी मागणी निवेदनातद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मिलिंद जंजाळे, अर्जुन जंजाळे, सागर सोनवणे, देवानंद जंजाळे, विक्रम सुरवाडे, भूषण तायडे, विलास सोनवणे, मुकेश तायडे, गणेश जंजाळे, विजय जंजाळे, दिपक जंजाळे, चंद्रकांत पवार, उमेश शिरसाडे, सचिन सोनवणे, राहुल जंजाळे, सागर भालेराव, रवी भालेराव, रवी पवार आदी सह समाज बांधवांच्या सह्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रती माहीतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री (महाराष्द्र राज्य), जिल्हाधिकारी (जळगाव), पोलीस अधिक्षक जळगाव , विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांना देण्यात आलेल्या आहेत.