नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्या कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात यावी असे सरकारला वाटते, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी दैनिकाला विशेष मुलाखत दिली. ‘एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गुंतवणुकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला,’ असे त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी गुंतवणुकदारांनी एअर इंडिया कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळे कंपनी विकली गेली नव्हती. यावेळी अर्थमंत्र्यांनी आर्थिक मंदीबाबत भाष्य केले. आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत, असेही सीतारमन यांनी सांगितले.