चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल मंदीरात भक्तीगंध महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित भजनसंध्या मोठ्या भक्तीभावात पार पडली.
सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी सण,उत्सवासोबतच भजन व किर्तनाच्या माध्यमातून लोक एकत्र येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत असतात,मोठ्या भक्तीभावाने आणि श्रध्देने भजनातून पूजन केले जाते. आणि देवदेवतांची सतत कृपादृष्टी राहावी म्हणून मनोभावे आराधना केली जात असते. त्यामागे एक व्यापक विचार असून भक्तीची गुंफण करतांना कौंटुंबिक नाती दृढ होताना नविन नाती निर्माण होत असतात. या अनुषंगाने शहरातील विठ्ठल मंदीरात भक्तीगंध महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित भजनसंध्या मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली.
आध्यात्म वृध्दिंगत व्हावे,तरुण पिढीवर चांगले संस्कार होउन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी,चांगल्या विचारांचे प्रबोधन व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून एकादशी निमित्त प.पु.अनिल महाराज जोशी (औदुंबरवाडी) यांच्या भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता शहरातील टिळक चौक स्थित विठ्ठल मंदीरात करण्यात आली. यावेळी भक्तीगंध भजनी महिला मंडळाच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमातून भक्तीची गुंफण करण्यात आली.सुरुवातीस मनोभावे प्रार्थना व गणरायास वंदन करण्यात आले. तर विविध गीतांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.
संगीत शिक्षक तथा गायक श्रीनिवास मोडक यांच्या समवेत माया जोशी,जयश्री निबांळकर,राजश्री शुक्ल,सीमा कुलकर्णी,शोभा कोतकर,सरोज जाधव,सरोज देशपांडे, अर्चना चौधरी, स्मिता पवार, लता परचुरे,अनुराधा साळुंके,हेमा पाटील,जयश्री कोठावदे,शकुंतला पाटे,सुमन साळुंखे,शालिनी पवार,अर्चना पाटील,जयश्री नेवे,केतकी गांगुर्डे,सुषमा पाठक,प्रमिला भामरे,संध्या कासार आदी भाविक महिलानीं यावेळी भक्तीगीते सादर केलीत. तर यावेळी बाळकृष्ण पाठक,सुरेश कोतकर,वसंत वाणी,रमेश सोनगिरे,रघुनाथ धामणे,सुर्यकांत शिनकर,प्रदीप येवले,कल्याण चव्हाण,सुनिल पाटे,मनोज घांगुर्डे,उदय धामणे,प्रकाश भामरे,विवेकानंद कोतकर,प्रकाश कोठावदे,बाळासाहेब शांडील्य,अशोक शिरुडे,नारायण कोठावदे,नारायण ब्राह्मणकर आदी सेवेकरी उपस्थित होते.