गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गडचिरोली जिल्हयात अहेरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम – हलगेकर यांचा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. आपल्या पहिल्याच भाषणात अजित पवार आणि वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर निशाणा साधला.
वडिलांचा विरोध असताना देखील त्याला जुमानता भाग्यश्री आत्राम यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करताना यावेळी भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, ‘ मी शांत आहे ते बरे आहे, नाहीतर माझ्याकडे दहा हात आहेत. मी शेरनी आहे. तुमच्याकडे दुधारी तलवार असल्याचे तुम्ही म्हणत असाल तर मी देखील दुर्गा आणि चंडीचा अवतार आहे. मला आक्रमक होण्याची संधी देऊ नका, आगामी काळात मैदानही आमचेच असेल आणि तिथे चौकार, षटकार देखील आम्हीच लगावणार.
भाग्यश्री आत्राम यांनी पुढे म्हटले की, मी घर फोडून बाहेर पडले नाही तर घर फोडून अजित पवार बाहेर पडले असल्याचे भाग्यश्री यांनी म्हटले आहे. आधी अजित पवार यांनी ते कबूल करावे, अशा शब्दात भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय हा माझा आहे.