जळगाव, प्रतिनिधी | संस्कृतसाठी काम करणाऱ्या ‘ज्योतिर्मयी’ संस्थेतर्फे गीताजयंतीनिमित्त नुकतीच (दि.७) गीताजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘भगवत् गीता अंताक्षरी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. समर्थ रामदास स्वामी मंदिरात संपन्न झालेल्या या स्पर्धेत सात संघ म्हणजे २८ महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक कर्मयोग या संघाने मिळवला तर द्वितीय क्रमांक भक्तियोग संघाने व तृतीय क्रमांक विभूतियोग संघाला मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस सांख्य योग संघाला मिळाले तर विशेष सादरीकरणाचे वैयक्तीक पारितोषिक सौ सुजाता देशपांडे यांनी मिळवले.
या स्पर्धेत भगवत् गीतेतील श्लोकच म्हणायचे होते, तरीही सर्वच संघांनी सगळ्या विविध राऊंडला उत्तम प्रतिसाद देत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत सहभागी झालेले सात संघ भक्तीयोग, पुरुषोत्तम, कर्मयोग, कर्मसंन्यासयोग, विभूतीयोग, सांख्ययोग, आत्मसंयमयोग असे होते. ‘ज्योतिर्मयी’च्या संचालिका प्रा. रेखा रमेश मुजुमदार, माधुरी फडके, कुंदा परांजपे, स्वाती कुलकर्णी, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व अंजली हांडे ह्यांच्या दीप मंत्राने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मंजूषा राव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. स्पर्धेचे संपूर्ण संचलन प्रा. रेखा मुजुमदार यांनी केले. रजनी पाठक यांनी गुणलेखन तर आशिष जोशींनी समय निरक्षकाचे काम केले.
यावेळी प्रमुख अतिथी ‘उद्यमी’च्या अध्यक्षा मीनाताई जोशी, श्री. राजेंद्र जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सुजाता देशपांडे, कल्याणी घारपुरे, सुजाता गाजरे, स्नेहा भुसारी, सुनिता भंडारी, ह्यांनी सहकार्य केले. शेवटी श्रीनारायण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेला गीताप्रेमींनी आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
विजेत्या संघांमधील स्पर्धकांची नावे अशी आहेत. प्रथम । कर्मयोग- कमल बोरोले, नीलिमा चौधरी, शालिनी कोल्हे, कल्याणी घारपुरे. द्वितीय भक्तियोग- शोभा पाटील, सुरेखा चौधरी, शर्मिला काळे, कामिनी राणे. तृतीय विभूतियोग- सुजाता देशपांडे, रजनी चौधरी, ज्योती कुलकर्णी, सुनंदा देशमुख. उत्तेजनार्थ सांख्य योग- उषा महाजन, कुमुदिनी महाजन, ऋचा पाटील, पुष्पा कोळंबे.