भडगाव शेतकरी संघाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा- परदेशी

भडगाव प्रतिनिधी । भडगाव शेतकरी संघाचा भोंगळ कारभार चालला असुन चेअरमनसह संचालक मंडळाचा रिंग मास्टर हा मुदत संपलेला मॅनेजर आहे कि काय ? अशी सर्व सामान्य शेतकर्‍यांची भावना झाली असून सदर अकार्यक्षम चेअरमनसह संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

पत्रकार परीषदेत बोलताना गणेश परदेशी यांनी सांगितले कि, शासनाने शेतकर्‍यांच्या सोयीसाठी त्यांच्या कल्याणासाठी शेतकरी संघा सारख्या संस्थाची स्थापना केली आहे. परंतु भडगाव शेतकरी संघ ही संस्था शेतकर्‍यांच्या हिताची नसून ती व्यापारी वर्गाच्या कल्याणासाठी असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
नुकतीच शासनाकडून हमीभावानुसार ज्वारी, बाजरी आणि मक्याची खरेदी सुरु झाली आहे. दि.१ डिसेंबर २० पासून वरील माल असलेल्या शेतकर्‍यांच्या नांव नोंदणीची सुरु करण्यात आली त्या प्रमाणे १ डिसेंबर रोजीच शेतकर्‍यांनी ७/१२ उतारे आणि लागणारे कागदपत्रे दिलेत. सगळ्यात आधी नंबर लागेल या आशेने चौकशी करण्यासाठी ते गेले असता त्यांना तुमचा ७० वा नंबर आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

या बाबत संबधित चेअरमन आणि संचालकांना विचारले असता त्यांना याप्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचा बनाव त्यांच्या कडून करण्यात आला. नंतर काही शेतकर्‍यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कडे तक्रारी केल्या असता त्यांनी चौकशीचे आदेश दिले. पण थातुर मातुर चौकशी करुन संबंधीत मॅनेजरला हाताशी धरुन काही व्यापार्‍यांनी आपले कार्य साध्य करुन आपल्या गोडाऊन मधील हजारो क्विंटल ज्वारी, बाजरी, मका या शासकीय हमी भावात मोजत असल्याचे कळते.

दरम्यान, गुरुवार दि.१७ डिसेंबर पासून वरील पातळीवरुन मका खरेदी बंद झाल्याचे कळले आहे. आता व्यापारी १८५० चा मक्याला हमीभाव असतांना व्यापारी खूप कमी म्हणजे ११००, १२०० रु ने मागता आहेत. ही सर्व साधारण शेतकरी वर्गाची पिळवणूक आहे. म्हणून शासनाने मका खरेदी त्वरीत सुरू करावी. एकीकडे शासन शेतकर्‍यांना धिर देण्याचा प्रयत्न करत असतांना भडगाव शेतकरी संघाच्या चेअरमनसह संचालक मंडळाचे निष्क्रिय धोरणामुळे तालुक्यातील शेतकरी भरडला जात आहे. भडगाव शेतकरी संघातील कळीचा नारद आपल्या सेवेचा कालावधी संपलेला मनेजर अवधुत देशमुख यांना तात्काळ कामावरुन कमी न केल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांसह आपण स्वतः आंदोलन करु असा इशारा गणेश परदेशी यांनी शेवटी त्यांनी दिला आहे.

शेतकरी संघाचे मॅनेजर अवधूत देशमुख यांचा वयानुसार सेवा कार्यकाळ संपल्यानंतर देखील त्यांना ठराव करुन दि.१/४/२० ते ३०/४/२०२३ पर्यंत मुदतवाढ का…? शेतकर्‍यांना वेठिस धरुन व्यापारी हित जोपासणारे मनेजर वर संचालक मंडळाची एवढी मेहरबान का? यात संचालक मंडळाने संगनमताने काही हात ओले केले तर नाहिना.? बाहेर इतके गरजु सुसंस्कृत उमेदवार त्या पदासाठी इच्छुक असतांना रितसर जाहिरात देऊन नविन चांगला व्यवस्थापक न भरता या मनेजरवर संचालक मंडळाची मेहरनजर का…? असे एक ना अनेक प्रश्‍न परिसरातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहेत.

Protected Content