भडगावात तीन लाखाची जबरी चोरी; एकावर हल्ला

123

भडगाव । शहरातील शिवाजी नगरात आज रात्री 3 वाजे सुमारास घराचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सुमारे 3 लाख रुपयांची जबर चोरी करून घरातील सर्वांना मारहाण करीत एकाच्या डोक्यात डोक्यात टॅमी मारून गंभीर जखमी केल्याची घटना भडगाव शहरात घडली असून याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीबाबत भडगाव शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी- सरिता गोविंदसिंग पाटील (वय-38) रा. शिवाजीनगर भडगाव यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी 3 वाजे सुमारास सर्व जण झोपले असता 3 ते 4 अज्ञात चोरट्यानी घराच्या मागील दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. व फिर्यादी त्यांचे पती व सासरे यांना दमदाटी करून बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यदीचा अंगावरील मंगळसूत्र, चैन, अंगठी यासह रोख रक्कम असे एकूण 2 लाख 14 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यान विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव हे करीत आहे.

घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनास्थळी जळगाव येथुन स्वान पथक पाचारण करण्यात आले होते. तसेच चाळीसगाव चे आप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्चाव, पोलिस निरीक्षक धनंजय येरूले, सपोनि रवींद्र जाधव, पोलिस कॉन्स्टेबल नितीन रावते, लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, समाधान पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Add Comment

Protected Content