लाच मागणे भोवले : रावेरच्या वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी ।  शासकीय कामाचा कंत्राटीपध्दतीने घेतलेल्या कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाल्यानंतर वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी २२ नोव्हेंबर रोजी केली होती. जळगाव लाचलुचपत विभागाने तक्रारीची चौकशीची करून आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी रावेर पोलीसात संशयित आरोपी मुकेश हरी महाजन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content