लाडक्या बहिणींचा बँक कर्मचाऱ्यांशी हाेताेय वाद; कर्मचारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा| राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले आहे. पहिल्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. शनिवारी पुण्यात थाटात या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला. मात्र, आता ही योजना बँक कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले आहेत का, हे तपासण्यासाठी तसेच केवायसी पूर्ण करण्यासाठी महिला बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच काही महिलातर पैसे आलेत का नाही आले यावरून देखील बँक कर्मचाऱ्यांची हुज्जत आणि वाद घालत असून भांडणे करू लागली आहेत. यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडत आहे. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण येऊ लागला आहे. काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यात माहिती घेतांना त्यांचा बँकेतील कर्मचाऱ्यांची वाद होऊ लागला आहे. याच कारणामुळे बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षा सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार ने महिलांच्या खात्यात पैसे जमा केले असून ज्यांच्या खात्यात पैसे जमा अहळे नाहीत, अशा महिला बँकेत गर्दी करू लागल्या आहेत. केवायसी अपडेट नसल्याने त्यांच्यात तसेच लवकर योजनेचा लाभ मिळवा या साठी महिला बँक कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. बँकेत महिलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बँक कर्मचारी संघटनेने बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

Protected Content