गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाच्या च्या विद्यार्थ्यानी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयाच्या एम.बी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए व बी. सी.ए च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

 

महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा.चारूशीला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयात चांद्रयान-३ चा देखावा

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन,जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील बी. सी. ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा  व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. योगिता घोंगडे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content