जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विवेकानंद नगरातील विवाहितेला कौटुंबिक वादातून मारहाण करुन तिला घराबाहेर काढून देणाऱ्या पतीसह सासरच्या एका जणांविरोधात रविवार, १६ जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील विवेकानंद परिसरात रश्मी मुस्तफा तडवी वय २९ या वास्तव्यास आहेत. १६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विवेकानंद नगरात रश्मी हिला कौटुंबिक वादातून तिचे पती मुस्तफा जहाँगिर तडवी यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर पतीसह हमीदा जहाँगिर तडवी या दोघांनी रश्मी हिला शिवीगाळ करत घराबाहेर काढून दिले. याप्रकरणी रश्मी तडवी हिने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन पती मुस्तफा जहाँगिर तडवी व हमीदा जहाँगिर तडवी दोन्ही रा. मूळ तहानगर, फैजपूर, ह.मु.विवेकानंद नगर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक हे करीत आहेत.



