सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | साधूंना मुले चोरणार्या टोळीतील सदस्य समजून सांगली तालुक्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. यानंतर, आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यातून बेदम मारहाणीची भयावहता दिसून येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यात मूळचे उत्तरप्रदेशातील साधू जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.