जळगाव प्रतिनिधी । खाटीच्या दोऱ्या तोडल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगलपुरी येथील घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, परविन मुस्ताक मिर्झा (वय-४१) रा. मंगलपुरी, जळगाव ह्या आपल्या परिवारासह राहतात. शनिवारी ५ जून रोजी रात्री ८ वाजता परविन मिर्झा आपल्या घराच्या अंगणात शेजारच्यांशी गप्पा मारत होते. त्यावेळी गावातील गोलू जगदीश मराठे हा ८.३० वाजता मिर्झा यांच्या घरासमोर आला व खाटीचे दोऱ्या तोडल्या. त्यावेळी परिवन यांनी दोऱ्या तोडल्याचा जाब विचारला त्यावर गोलू मराठेने परिवन मिर्झा आणि त्यांची बहिण शमीन शेख रशीद यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ केली. परविन मिर्झा याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.