शेतीच्या वाटणीच्या जुन्या वादातून बापलेकाला मारहाण

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। अमळनेर तालुक्यातील रुंधाटी गावात जुन्या शेतीच्या वाटणीच्या वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना गावात राहणाऱ्या ५ जणांनी बेदम मारहाण करून लोखंडी डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना बुधवार १५ मे रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी अमळनेर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील रुंधाटी गावात गणेश भास्कर पवार वय-३१ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतीच्या वाटणीवरून वाद होता. या कारणावरून बुधवारी १५ मे रोजी रात्री ८ वाजता गणेश पवार व त्याचे वडील भास्कर पवार यांना गावात राहणारे सागर भाईदास पवार, अतुल शिवाजी पवार, सर्जेराव आनंदा पवार, भाईदास आनंद पवार आणि देविदास आनंद पवार या पाच जणांनी गावात त्यांच्या घरासमोर येऊन गणेश पवार व त्याचे वडील भास्कर पवार या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच यातील एकाने हातातील लोखंडी पाईप गणेशच्या डोक्यात टाकला आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार १६ मे रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसात सागर भाईदास पवार, अतुल शिवाजी पवार, सर्जेराव आरंदा पवार, भाईदास आनंदा पवार, देविदास आनंदा पवार सर्व रा. रुंधाटी ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील हे करीत आहे.

Protected Content