Home क्राईम पन्नास हजारासाठी उपाशीपोटी ठेवून विवाहितेला मारहाण व छळ

पन्नास हजारासाठी उपाशीपोटी ठेवून विवाहितेला मारहाण व छळ


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पवारवाडीयेथील माहेरवाशीनीला सासरी नाशिक येथे चिकन दुकान टाकण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी करत मारहाण करत छळ केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २ मे रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील पवार वाडी येथील माहेर असलेल्या निलोफर दगडू खाटीक वय ३० यांचा विवाह नाशिक येथील दगडू यूसूफ खाटीक यांचा धर्माप्रमाणे झालेला आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर पती दगडू खाटीक याने विवाहितेला ५० हजारांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही याचा रागातून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तर सासू, दीर, नणंद आणि नंदोई यांनी उपाशीपोटी ठेवून छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता चाळीसगाव येथील माहेरी निघून आल्या.त्यानंतर बुधवारी २ मे रोजी दुपारी २ वाजता त्यांनी चाळीसगाव शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पती दगडू यूसूफ खाटकी, सासू जरीनाबी युसूफ खाटीक, दीर शाकीर युसूफ खाटीक रा. नाशिक, नणंद अकिला अकबर खाटील, नंदोई अकबर ईसा खाटीक, रा. पाथर्डी नाशिक, नणंद रिहाना अकबर खाटील आणि नंदोई अकबर दादामिया खाटील रा. सिडको नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाख ल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound