Home क्राईम ट्रॅक्टरसाठी ४ लाखांसाठी विवाहितेला मारहाण व छळ

ट्रॅक्टरसाठी ४ लाखांसाठी विवाहितेला मारहाण व छळ

0
43


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी येथील सासरच्या मंडळींनी ट्रॅक्टर घेण्यासाठी ४ लाखांची मागणी करत शारीरिक छळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे, तसेच पतीने दुसरे लग्न करण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील माहेर असलेल्या प्रतिभा उमेश पाटील (वय-२६) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी येथील उमेश पाटील यांच्याशी रीतीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती उमेश पाटील यांनी पत्नी प्रतिभा पाटील यांना माहेर होऊन ट्रॅक्टर घेण्यासाठी ४ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही याचा राग आल्याने पतीकडून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. आणि दुसरे लग्न करण्याची धमकी पतीकडून मिळाली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान या प्रकरणी मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने पतीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पती उमेश पाटील यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound