सुप्रिम कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश तुकाराम पवार (वय-२३) रा. सुप्रीम कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीपी ४०२९) ही त्यांच्या घरासमोर पार्क करून लावली होती.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ही दुचाकी चोरून नेली, हा प्रकार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आला. दरम्यान त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही मिळून आली नाही, अखेर त्यांनी मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे

Protected Content