‘तुझ्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून दे’ म्हणत प्रौढाला मारहाण

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला मुलीचे लग्न माझ्याशी लावून देण्याची धमकी देत दोन जणांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका खेडेगावात राहणारे ५५ वर्षीय रामेश्वर (नाव बदललेले) व्यक्ती आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १ जानेवारी रोजी धुळे ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ ५५ वर्षीय व्यक्ती पायी जात असतांना त्यांच्या गावातील संशयित आरोपी संजय नगराज पाटील आणि पप्पू जयवंत वाघ यांने रामेश्वर यांचा हात पकडला. तर संजय पाटील म्हणाला की “तुझ्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून दे नाहीतर …” असे बोलला. याचा जाब रामेश्वर यांनी विचारला दोघांनी विटाने बेदम मारहाण केली. यात एकाने त्याचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  प्रकार चव्हाण कारीत आहे.

Protected Content