जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी फैजपूर येथे दोन लाखांसाठी मारहाण करून छळ केल्याची तक्रार रविवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता देण्यात आली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या रूपाली किरण कापडे वय २३ यांचा विवाह यावल तालुक्यातील फैजपूर येथील किरण संतोष कापडे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. परंतू त्यानंतर पती किरण कापडे यांनी विवाहितेला माहेराहून २ लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासून, सासरे, दिर आणि नणंद यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती किरण संतोष कापडे, सासू शोभाबाई संतोष कापडे, सासरे संतोष जयराम कापडे, दिर भूषण संतोष कापडे, आणि नणंद धनश्री निलेश मोरे सर्व रा. फैजपूर ता. यावल याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहे.