यावल येथे पेरू तोडण्याच्या कारणावरून मुलाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । बंगल्यावरील झाडाचे पेरू तोडण्याच्या कारणावरून लहान मुलांना शिवीगाळ करून एका मुलाचे डोके फोडल्याची घटना काला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात  दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील फालक नगरात शिरीष लीलाधर चौधरी यांच्या बंगल्यात लावलेल्या पेरूच्या झाडावरून पेरू तोडण्यासाठी दानिश सादीक शेख हा मुलगा वकार शेख, अनिदास शेख यांच्यासह काही मित्रांसोबत दगड मारले. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याचा राग आल्याने शिरीष लीलाधार चौधरी (वय-४५) यांनी मुलांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तर सादीक शेख याचे डोके फोडले, याप्रकरणी मुलाचे वडील शेख सादीक शेख हनिफ यांच्या फिर्यादीवरून शिरीष लिलाधर चौधरी आणि तन्मय शिरीष चौधरी (वय-१८) यांच्या विरोधात  यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे. 

 

Protected Content