जळगाव प्रतिनिधी । सामाईक शौचालयाच्या वादातून विवाहितेसह तिच्या परिवाराला बेदम मारहाण केल्याची घटना चौघुले प्लॉट परिसरात घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वृषाली पंकज साळुंखे (वय-२२) रा. चौघुले प्लॉट ह्या पती व सासु सासऱ्यांसह सोबत राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचे नातेवाईक विजय सुभाष साळुंखे राहातात. ६ मे रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास विजय साळुंखे हा सामाईक शौचालयात बसला असतांना वृषाली यांच्या सासू यांनी दरवाजा लावून घे असे सांगितल्याचा राग आल्याने विवाहिता वृषाली यांच्यासह पती पंकज साळुंखे, सासू आणि सासरे यांना विजय साळुंखे, विजयची पत्नी पूनम साळुंखे, बापू तुकाराम ठाकरे, अमोल बापू ठाकरे रा. वटार ता.चोपडा यांनी शिवीगाळ व मारहाण केली. विजयची पत्नी पुनम साळुंखे हिने वृषाली यांच्या कमरेला व पोटाला चावा घेतला. विवाहितेच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास अभिजित सैंदाणे करीत आहे.