Home Agri Trends चिंचोली शिवारात अस्वलाचा वावर ( व्हिडीओ )

चिंचोली शिवारात अस्वलाचा वावर ( व्हिडीओ )

0
48

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या चिंचोली शिवारात आज अस्वलाचा वापर असल्याचे दिसून आल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथून जवळस असणार्‍या चिंचोली येथील विजय निंबा पाटील, सुनील फकीरा पाटील, शामकांत साठे, वासुदेव साठे आदी ग्रामस्थांच्या शेतामध्ये अस्वलाचा वावर दिसून आला आहे. गत चार-पाच दिवसांपासून हे अस्वल दिसून येत असून रविवारीदेखील केळीच्या बागात याला शेतकर्‍यांनी पाहिले आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने तातडीने सापळा लाऊन हे अस्वल पकडून याला जंगलात सोडण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पहा : चिंचोली येथील शेतातल्या अस्वलाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound