भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी बियाणे घेतांना काळजी घेण्याचे आवाहन कृषी खात्याच्या पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरासह तालुक्यात जिल्हास्तरावरून भरारी पथकाची कृषी केंद्रंवर तपासणी करण्यात आली. तसेच कृषी केंद्र चालकांची बैठक घेतली या बैठकीत तालुका अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव सुनील पाटील, संजीव पाटील, प्रकाश राठोड, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
येणार्या खरीप हंगामात बियाण्याचा तुटवडा होणार नाही जिल्ह्याला पुरतील एवढे कापसाचे बियाणे २५ लाख पॅकेट जिल्ह्यात येतील त्यामुळे कापूस बियाणे तुटवडा होणार नाही असे तुम्ही शेतकर्यांना समजून सांगा ज्यादा दराने बियाणे विक्री करू नका. शेतकर्यांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या असे उपस्थितांना सांगण्यात आले.
या जिल्हास्तरीय पथकामध्ये गुणवत्ता निरीक्षक अधिकारी विवेक बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी बागले यांची उपस्थिती होती. तसेच शेतकर्यांनी कुठल्याही एका वाणाची मागणी न करता रास्त दरानेच बियाणे खरेदी करा; पक्क्या बिलासह परवानाधारक कृषी विक्री केंद्रांवरून खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे
शेतकर्यांनी कुठल्याही एका वाणाचा आग्रह करू नका एक जून नंतरच लागवड करावी दोन झाडां मध्ये योग्य अंतर ठेवा खताचे व्यवस्थापन योग्य वेळेवर करा असे आवाहन गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विवेक बोरसे यांनी केले.