फैजपुरात अस्वच्छतेचा कळस : पालिकेचे दुर्लक्ष; नागरिक संतापले

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनीधी | शहरातील गटारी तुडुंब भरल्या असून वेळीच गटारी निघत नसल्याने सर्वत्र गटारी अस्व्छतेबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट असून या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या प्रकरणी शेख कुर्बान यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

फैजपुर शहरात सध्या अस्वच्छतेने कळस गाठला आहे. यात शहरातील विद्यानगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळ गटारी फुटून थेट पाणी केंद्र परिसरात येत असल्याने हे काम बांधकाम विभाग काम असल्याचे सांगत आरोग्य विभाग हे बांधकाम विभाग काम आहे ते गटारी दुरुस्त करेल तेव्हाच आम्ही सफाई करू शकतो असे सांगत आहेत. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी हे अजून त्याचे कडे या विषयाकडे लक्ष देण्याची तसदी घेण्यात आली नाही. यात जन भावनेचा आदर करत आता तरी दोन दिवसात गटारी कामे न झाल्यास जनते मध्ये पालिका प्रशासन बाबत मोठं रोष निर्माण होऊ शकतो याबाबत पालिका प्रशासन फक्तं कागदो पत्री कामे करण्यात व्यस्त दिसत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना वेळोवेळी या भागातील नागरिक व पालिका माजी नगरसेवक अमोल निंबाळे यांनी सांगितले आहे मात्र दोन महिने उलटून ही कामे होत नसल्यानं कामे सांगावी तर कौनाला असा प्रश्न पडला आहे.

फैजपूर शहरात आज रोजी नाले सफाई कामे फक्त कागदोपत्री सुरू असून यात पलिके कडे स्वतःच जेसीबी उपलब्ध असतांना ते भाड्याने घेऊन लाखो रुपयांची रक्कम अनाठायी खर्च जनतेचा पैश्या तून करण्याचा प्रयोजन काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, जे सी. बी भाडे तत्वावर लावून लाखो रुपयांची बिले काढण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोग्य विभाग हे मान्सून पूर्व नाले सफाई करायला पाहिजे मात्र ही कामे पालिकेच्या स्वतः च्या जेसीबी करायला पाहिजे. मात्र भाडे तत्वावर जेसीबी व ट्रॅक्टर लावून पालिकेच्या तिजोरी तून लाखो रुपयांची उधळपट्टी रोखावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संदर्भात, पालिकेच्या आरोग्य निरीक्षक यांना वेळोवेळी सांगून सुध्दा कोणतेच सफाई ची कामे होत नाही तसेच पावसाळा पूर्वी गटारी पाणी घरात शिरु शकते मात्र ते दुर्लक्ष करीत असल्यान याच्यावर कारवाई करावी तसेच त्याची दोन तक्रारी बाबत खाते निहाय चौकशी सुरू असताना त्याच्या वर कारवाई का होत नाही ? अशी लेखी तक्रार माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्याधिकारी भूषण वर्मा याच्या कडे केली आहे.

Protected Content