मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटूंच्या नव्या कराराची घोषणा गुरुवारी केली आहे. मात्र, या करारात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोठेही स्थान देण्यात आलेले नाही.
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा बीसीसीआय आणि खेळाडूंचा हा करार आहे. नवदीप सैनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांची या करारामध्ये वर्णी लागली आहे. बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंचं ग्रेड ए प्लस, ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी असे वर्गीकरण केले आहे. ए प्लस खेळाडूंना ७ कोटी रुपये, ए ग्रेडमधल्या खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड बीमधल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि ग्रेड सीमधल्या खेळाडूंना १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंना या रकमेसोबतच प्रत्येक मॅचसाठी वेगळे मानधन आणि बोनसही देण्यात येतो. एकूण २७ खेळाडूंसोबत बीसीसीआयने या वर्षासाठीचा करार केला आहे.
ए प्लस ग्रेड (७ कोटी रुपये) :- विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ए ग्रेड (५ कोटी रुपये) :- आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत
बी ग्रेड (३ कोटी रुपये) :- ऋद्धीमान सहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल.
सी ग्रेड (१ कोटी रुपये) :- केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर