जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील सुर्यराज इंडस्ट्रीज कंपनीतील गोडावून मध्ये ठेवलेल्या बारदानला अचानक आग लागल्याची घटना उघडकीला आली आहे. या आगीत लाखो रूपयांचे बारदान जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी २९ जुलै सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीच्या एन-सेक्टर मध्ये सुर्यराज इंडस्ट्रिज नावाची कंपनी आहे. या कंपनीत बारदान खरेदी विक्री केलेले बारदान ठेवले जाते. यात ठिकाणी गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर बारदान ठेवण्यात आले होते. शुक्रवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोडावून मध्ये ठेवलेल्या बारदानला अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. यात सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. धवल खिमजी भानूशाली (वय-४५) रा. जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनीवारी २९ सायंकाळी ७ वाजता अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.