फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथे मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त आज सायंकाळी बारागाड्या ओढण्यात येणार आहेत.
येथील दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थान आहे. यात्रोत्सवा निमित्त सालाबाद प्रमाणे दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता फैजपूर शहरात परंपरागत पद्धतीने बारागाड्या भगत संजय सेवकराम कोल्हे हे ओढतील. यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी असंख्य भक्तगणांची साथ लाभणार आहे. बारागाड्या शहरातील अंकलेश्वर बर्हाणपूर मार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक पर्यंत ओढल्या जातात. पुरातन काळात फैजपुरात कॉलरासह साथीचे आजार आले होते. तेव्हा मरिमातेच्या कृपेने ही रोगराई संपुष्टात आल्यामुळे दरवर्षी बारागाड्या ओढण्याची प्रथा सुरू झाली असून ती आजवर कायम आहे.
मरीमातेचा मंदिराचा परिसर नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांनी पेव्हरब्लॉक दलित वस्ती निधीतून बसवण्यात मोठा हातभार लावला आहे. लवकरच सभामंडप उभारण्यात येणार असल्याचे प्रभाकर सपकाळे यांनी सांगितले.