निवडणूक काळात बँकांनी पैश्यांच्या व्यवहारांवर बारकाईने विशेष लक्ष ठेवावे : डॉ.अविनाश ढाकणे

dde88e88 516a 456e bf3a e78d4df1b71c

 

जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभेच्या निवडणूकीत निवडणूक लढविणा-या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने 28 लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. तथापि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला छेद देण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, सहकारी बँका तसेच पतसंस्थांनी निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील. यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.

 

निवडणूक काळात बँकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बॅंकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल मलवाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडीत, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था मेधराज राठोड, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे महाव्यवस्थापक श्री. देशमुख, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार श्री. मोरे, श्री. कळसकर यांचेसह भारतीय रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील राष्टीयकृत बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, निवडणूकी दरम्यान उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैश्यांव्यतिरिक्त वस्तु स्वरूपात अनेक प्रलोभने दाखवितात. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूकीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. जेही उमेदवार खाते उघडण्यासाठी येतील त्यांचे खाते तातडीने उघडून द्यावे. विधानसभा निवडणुक लढविणा-या उमेदवाराला निवडणूकीसाठी 28 लाख रूपयांची खर्च मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च होणार नाही यावर लक्ष ठेवावे. तसेच निवडणूक खर्चासाठी लागणाऱ्या रक्कमा या 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास अशा रक्कमा या धनादेशाद्वारेच दिल्या जातील याची दक्षत घ्यावी.

बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या भरणा किंवा पैसे काढलेल्या व्यवहाराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्या पत्यावर नोंदवावी. निवडणूक कालावधीत उमेदवारांव्यतिरिक्त ज्या खात्यावरुन वारंवार रक्कमा काढल्या जात असल्यास त्याहीची माहिती द्यावी. अशा खात्यावर बॅकेच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्यात. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करतांना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना‍ दिल्यात. त्याचबरोबर ज्या बँकेचे अधिकारी, कर्मचाऱी यांची निवडणूकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या

Protected Content